गर्दीच्या वेळेतच लोकलना होणारा विलंब, तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत होणारी सेवा, फेऱ्या रद्द होणे या गोष्टी मुंबईच्या उपनगरी सेवेच्या पाचवीला पूजलेल्या आहेत. त्यामुळे वक्तशीरपणा हा मुंबई लोकलच्या केवळ वेळापत्रकातच दिसतो. वेळापत्रकानुसार कधीही न धावणाऱ्या रेल्वेची दखल अखेर रेल्वेमंत्र्यांनी घेतली आणि दोन महिन्यांत वक्तशीरपणा सुधारण्याची तंबी दिली. मात्र त्यांची ही कडू गोळीची मात्रा कितपत प्रभावी ठरेल, याबाबत शंकाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई उपनगरीय रेल्वे मध्य रेल्वे मुख्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशी विभागली गेली आहे. या तिन्ही मार्गावरील दररोजची प्रवासी संख्या पाहिल्यास ती ७५ लाखांहून अधिक आहे. यात सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल सेवेवर मोठा ताण आहे. प्रवास सुकर होण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाकडून लोकल फेऱ्यांमध्येही वर्षांगणिक वाढ केली जाते. परंतु फेऱ्या वाढविल्यानंतरही प्रवास सुकर झालेला नाही. उलट तांत्रिक समस्यांनीच रेल्वेला वेढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेवरील तीनही मार्गावरील लोकल असो वा मेल-एक्स्प्रेस गाडय़ा, या अनेक कारणास्तव उशिराने धावत असून त्यांचा वक्तशीरपणा सुरळीत ठेवण्यास मध्य, पश्चिम रेल्वेला अपयशच आले आहे.

२०१७-१८ मध्ये पश्चिम रेल्वेवरील १३ हजार ६९५ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. २०१६-१७ मध्ये हाच आकडा १५ हजार १२० एवढा होता. मध्य रेल्वेवरही २०१६-१७ मध्ये १९ हजार लोकल फेऱ्या तर २०१७-१८ मध्ये तेवढय़ाच प्रमाणात फेऱ्यांच्या वक्तशीरपणाची गाडी घसरलेली आहे. सिग्नल बिघाड, अभियांत्रिकी कामे, पाऊस, विनाकारण गाडीतील आपत्कालीन चेन खेचणे, प्रवासी अपघात, ओव्हरहेड यांसारख्या कारणांमुळे वक्तशीरपणात चांगली कामगिरी करता येत नाही. याशिवाय मोठय़ा प्रमाणात लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये होणारे बिघाड, मुंबईत उशिराने येणाऱ्या व जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना प्राधान्य देण्यासाठी लोकल थांबविणे, रेल्वे फाटक जास्त वेळ सुरू राहणे ही कारणेदेखील प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

मध्य रेल्वे तर या सर्व कारणांमुळे वक्तशीरपणात मागेच राहिली. लोकलचा वक्तशीरपणा ९० टक्क्यांहून अधिक असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत असले तरी ते खरे नाही. ऑगस्ट महिन्यात रेल्वे मंत्रालयाने मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वक्तशीरपणाच्या घेतलेल्या आढाव्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणात सुधारणा झालेली नाही. उलट ७०.९३ टक्क्यांसह मध्य रेल्वे देशभरातील सर्व रेल्वे विभागांत ५५ क्रमांकांवर घसरली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल विभागाने मात्र ९४ टक्क्यांसह आठवा क्रमांक पटकावला. मे महिन्यात तर मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ५३.७ टक्के होता. तोच पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा ९० टक्क्यांपर्यंत होता.

मुंबईत येणाऱ्या व मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ा या जलद लोकल प्रवाशांसाठी काही वेळा डोकेदुखीच ठरतात. उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा काही कारणास्तव मुंबईत उशिराने आल्या तर त्याचा परिणाम हा लोकल फेऱ्यांवर होतो. त्यामुळे मुंबईतून पुन्हा या गाडय़ा सुटण्यासही उशीर होतो. त्यांना देण्यात येणाऱ्या प्राधान्यामुळे लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक दिवसभरात बिघडतच जाते. इंजिनमध्ये होणारे बिघाड, सुरुवातीच्या स्थानकातून काही तांत्रिक कारणास्तव सुटण्यासाठी लागलेला वेळ यासह अन्य काही कारणांमुळे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना बिलंबच होत असल्याचे सांगितले जाते. मुंबईत प्रवेश केल्यानंतर मेल-एक्स्प्रेस गाडय़ा शेवटच्या स्थानकापर्यंत आणताना रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडते.

मध्य रेल्वेवर पनवेलपासून मुंबईत येईपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना तब्बल एक ते दीड तासही मोजावे लागतात. त्यामुळे पनवेलपर्यंत सहा तासांपेक्षा जास्त प्रवास करून आलेल्या प्रवाशाला त्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येईपर्यंत नाहक जादा वेळ खर्ची करावा लागतो. यामागील कारण अद्यापही प्रवाशांना रेल्वेकडून समजलेले नाही. तर डहाणूनंतर मुंबई सेंट्रलपर्यंत अशाच परिस्थितीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यासाठी अनेक थातूरमातूर कारणे रेल्वे प्रशासनाकडून दिली जातात. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी काही ठिकाणी अद्यापही पूर्ण होऊ न शकलेली स्वतंत्र मार्गिका हेदेखील त्यामागील एक कारण ठरते.

प्रवाशांना होणाऱ्या या मनस्तापाची व तक्रारींची दखल घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य व पश्चिम रेल्वेला लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वक्तशीरपणात ऑक्टोबपर्यंत सुधारणा करण्याचे आदेश दिले. नोव्हेंबरपासून या सर्व गाडय़ांच्या वक्तशीरपणाची कामगिरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त असली पाहिजे, अशा सूचनाही केल्या. या आदेशानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून देखभाल-दुरुस्तीसह मेगाब्लॉक काळात केली जाणारी कामे वेळेत व व्यवस्थित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेने तर ब्लॉकची काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करताना या वेळेत वेळापत्रक कसे सुरळीत ठेवता येईल त्यादृष्टीने नियोजनही सुरू केले आहे. मात्र गेली अनेक वर्षे वक्तशीरपणा सुधारण्यासाठी लागलेल्या कालावधीनंतरही येत्या दोन महिन्यांत त्यात सुधारणा होईल का, हा मोठा प्रश्नच आहे.