सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल समोर एका १८ ते १९ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र लोकलच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून तात्काळ आपत्कालिन ब्रेकचा वापर करुन लोकल थांबवली. त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले. वाशी स्थानकाजवळ मंगळवारी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मोटरमन प्रशांत कोन्नूर हे पनवेल-सीएसएमटी लोकलवर कार्यरत होते. मंगळवारी दुपारी २.०७ वाजता ही लोकल वाशी स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघत असतानाच एक १८ ते १९ वर्षीय तरुणी अचानक रुळावरच आली. हे पाहताच मोटरमन प्रशांत यांनी प्रसंगावधान राखून आपत्कालिन ब्रेकचा वापर करुन लोकल थांबवली. ही लोकल तरुणीच्या अगदी जवळ जाऊन थांबली. अन्यथा तिचा अपघात झाला असता. तरुणी आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. मोटरमनने या तरुणीला धीर देऊन त्याच लोकलमधील महिलांच्या पहिल्या डब्यात बसवले आणि त्यानंतर गाडी पुन्हा पुढे रवाना करण्यात आली. या घटनेची माहिती त्वरीत रेल्वे नियत्रंण कक्ष, रेल्वे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आली.