नीलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाटय़नगरी असे बिरुद मिरवणाऱ्या दादरमध्ये टाळेबंदी शिथिलीकरणानंतर नाटकांचे प्रयोग सुरू होतील, अशी रसिकजनांना अपेक्षा होती. यशवंत नाटय़मंदिरचा रखडलेला पाहणी अहवाल, रवींद्र नाटय़मंदिराबाबतचा भाडे सवलतीचा रखडलेला प्रश्न, तर शिवाजी नाटय़मंदिरमध्ये सुरू असलेली दुरुस्ती यांमुळे तूर्तास तिथे प्रयोग करणे शक्य नसल्याचे नाटय़कर्मीचे म्हणणे आहे. मात्र महिनाभरात दुरुस्ती पूर्ण होताच शिवाजी मंदिर प्रयोगासाठी सज्ज होईल, असे आश्वासन नाटय़गृह प्रशासनाने दिले.

मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या नाटय़नगरी दादरमध्ये कायमच नाटकांना उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. नाटकांनी ‘पुनश्च हरीओम’ करून महिना उलटला. मात्र दादरमध्ये प्रयोग का लागत नाही, असा प्रश्न नाटय़वेडय़ा प्रेक्षकांना पडला आहे. बरेच प्रेक्षक आजही शिवाजी मंदिर, यशवंत नाटय़मंदिर परिसरात जाऊन प्रयोगांची चौकशी करताना दिसतात. ‘दादरमध्ये आलो की शिवाजी मंदिरला फेरी मारण्याचा क्रम कधीही चुकला नाही. इथल्या रकान्यांमध्ये नाटकाचे पोस्टर कधी झळकतील याचीच आम्ही वाट पाहतो आहोत.’ अशी प्रतिक्रिया नाटय़गृहाबाहेर उभ्या असलेल्या पेंडसे दाम्पत्याने दिली.

अनेक लोक कामाच्या, खरेदीच्या निमित्ताने दादरमध्ये येत असतात. त्यात दादर आणि नाटक हे समीकरण जुने असल्याने दादरच नाही तर मुंबईभरातील प्रेक्षकवर्ग इथे येत असतो. मात्र सध्या नाटय़ क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिराची दुरुस्ती सुरू आहे. करोनातील आठ महिने नाटय़गृह बंद असल्याने शिवाजी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व दुरुस्ती केल्या जात आहेत. या प्रक्रियेला अजून किमान एक महिना लागेल, असे प्रशासनाकडून समजते.

यशवंत नाटय़मंदिराचा अद्याप पाहणी अहवालच आला नसल्याने नाटय़गृह एवढय़ात खुले होईल असे वाटत नाही. तर ‘प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर प्रशस्त असले तरी प्रवासाच्या दृष्टीने आडवळणी असल्याने फारसा प्रतिसाद मिळत नाही. शासनाच्या अखत्यारीतील या नाटय़गृहाच्या भाडे सवलतीबाबत प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अधिकचे भाडे भरून प्रयोग लावणे जोखमीचे ठरू शकते.’ अशी प्रतिक्रिया निर्मिती सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी दिली.

प्रेक्षकांची ओढ..

शिवाजी मंदिरात नाटकाला आलेले लोक पुस्तक खरेदी करतात आणि पुस्तक खरेदी करायला आलेले लोक आवर्जून नाटकाची चौकशी करतात. अनेक  जण ग्रंथदालनात येऊन प्रयोग कधी सुरू होणार याबाबत विचारणा करतात. किंबहुना याचा आमच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. नाटकाचे प्रयोग लागत नसल्याने प्रेक्षकांच्या रूपाने येणारा ग्राहकवर्ग घटला, अशी माहिती मॅजेस्टिक ग्रंथदालनाच्या प्रतिनिधींनी दिली.

शिवाजी मंदिर गेली कित्येक वर्ष रंगभूमीची सेवा करत आले आहेत. त्यामुळे पुन्हा नाटक सुरू होताना, पहिला नाटय़प्रयोग शिवाजी मंदिर येथे व्हावा, अशी आमची इच्छा आणि प्रयत्नही होते. परंतु दुरुस्तीचे काम मोठे असल्याने जानेवारीचा पूर्ण महिना जाईल. असे असले तरी लवकरात लवकर प्रयोग व्हावा यासाठी आमचे सर्व बाजूने प्रयत्न सुरू आहेत.

– चंद्रकांत सावंत. सरचिटणीस, शिवाजी नाटय़मंदिर.