मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील स्टंटबाजी हा आता काही नवीन विषय राहिला नाही. काही चोर ट्रॅकवर उभे राहूनही लोकलमधल्या प्रवाशांचे मोबाइल खेचतात. कळव्यामध्ये १९ ऑगस्ट रोजी धावत्या मोबइलमधून मोबईल खेचलेला व्हिडीओ समोर आला आहे. रात्रीच्या १२:५३ मिनीटाच्या कल्याणकडे जाणाऱ्या गाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. कळवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील हा प्रकार आहे.
प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील तरुणाने दरवाज्यात उभ्या असेल्या प्रवाशाचा मोबइल खेचला. त्यानंतर त्या प्रवाशाने लगेच ट्रेनमधून उडी मारल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोराने मोबाइल खेचल्यानंतर धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
#Mumbai: कळव्यात ‘फटका गँग’चा प्रताप, मोबाइल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदhttps://t.co/ZfyIjgJO7V@Central_Railway @RailMinIndia @rpfcr pic.twitter.com/WxOXt192D7
— LoksattaLive (@LoksattaLive) August 30, 2018
प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीच्या किमान १० तक्रारी दाखल होतात. २०१७ या पूर्ण वर्षात १८ हजार मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मोबाइल चोरीचे १०० गुन्हे रोज दाखल होतात अशी माहिती दोन महिन्यापूर्वी GRP नी दिली होती . जे प्रवासी त्यांचा मोबाइल मिळण्याची आशाच सोडून देतात ते पोलिसात तक्रार द्यायला येत नाहीत. पोलिसात तक्रार न देणाऱ्या प्रवाशांचेही प्रमाण बरेच आहे असेही त्यांनी म्हटले होते.