‘मराठवाडय़ाने आणखी किती अन्याय सहन करायचा’ असा संताप व्यक्त करत आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही वेगळा मराठवाडा मागायचा का, असा सवाल शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केला.
विदर्भ, मराठवाडा व कोकणात सिंचनाचा असलेला अनुशेष, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसणे अशा मुद्दय़ांवरील चर्चेच्या वेळी, मराठवाडय़ात पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मराठवाडय़ाला दिले जात नसल्याची तक्रार  खोतकर यांनी केली. जायकवाडीच्या वरच्या बाजुला बावीस धरणे बांधून जायकवाडीची वाट लावण्याचे काम करण्यात आले आहे. एकीकडे मराठवाडय़ातील भूजल पातळी खालावत चालली आहे. बोअरना आता बंदी घाला, असे सांगत यापूर्वी काँग्रेसने मराठवाडय़ाचा छळ केला, आता परिस्थितीत बदल करा, अन्यथा वेगळा मराठवाडा मागण्याची वेळ येईल, असे खोतकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा