मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दैनिक लोकसत्ताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं. तसंच, सरकारच्या आगामी प्रकल्पांविषयीही थोडक्यात माहिती दिली.

“सरकार आज पडणार, उद्या पडणार असे मुहुर्त दिले गेले. पण सरकार अतिशय मजबुतीनं काम करतंय. २० महिने सातत्याने न थकता सर्व प्रसंगांना सामोरे जाऊन मी व माझे सहकारी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे केलंच पाहिजे. मी उपकारांची जाणीव करून देत नाही. राज्याच्या जनतेला या सत्तेचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका मनात ठेवून आम्ही काम करतो. मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला, देशाला काय दिलं ही भावना महत्त्वाची आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Opposition kaul in other constituencies except South Central Mumbai Dharavi Wadala
दक्षिण मध्य मुंबई धारावी, वडाळा वगळता इतर मतदारसंघांत विरोधी कौल
Embarrassment over the Chief Minister post in the Mahayuti
मुख्यमंत्रीपदावरून पेच; शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न? शपथविधीचा मुहूर्त…
Rashmi Shukla reappointed as Director General of Police
रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी; गृह विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
loksatta RangSamvad Maharashtra State Level Inter College Competition Rangsamvad Initiative
‘लोकसत्ता रंगसंवाद’मध्ये आज नाट्यविषयक पैलूंचा उलगडा; निर्माते-अभिनेते अजित भुरे, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा सहभाग
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या ३ हजार मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई, २१८ कोटी ९६ लाखांची थकबाकी वसूल
MNS candidate Rajesh Yerunkar from Dahisar questions the reliability of EVMs
मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का? दहिसरमधील मनसेच्या उमेदवाराचा ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर प्रश्न
ED takes major action against Fairplay app for online betting on elections
निवडणुकांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअरप्ले ॲपशी संबंधीत ईडीची मोठी कारवाई
Metro 3 Series of technical problems continue on Aarey-BKC route
मेट्रो ३ : आरे – बीकेसी मार्गिकेवर तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच

हेही वाचा >> “जागतिक तेलाच्या अर्थकारणापासून राजकारणातल्या तेल लावलेल्या पैलवानापर्यंत…”, लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने

ते पुढे म्हणाले, “कधीही बाहेर न पडणाऱ्यांना आम्ही बाहेर पडायला लावलं. चार-दोन सभांमधून अर्थहीन आरोप करण्याला काही अर्थ नसतो. अशा लोकांचा अनुभव आपण घेतला आहे. मी फार राजकीय बोलणार नाही. पण बाळासाहेबांची भूमिका व सर्वसामान्य माणसाची भूमिका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही सरकार स्थापन केलं आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढंच ध्येय समोर न ठेवता अवघा महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे, ही भावना आम्ही मनात ठेवली. एवढंच सांगतो की काम करणारे कार्यकर्ते, सत्ताधाऱ्यांच्या मागे लोक असतात. राम मंदिराचं उद्घाटन झालं आहे. त्यामुळे सगळ्यांना रामाने सदबुद्धी द्यावी. सगळ्यांना चांगले विचार द्यावेत.”

“आज भारताची अर्थव्यवस्था जगभरात अभिमान वाटावी अशी पुढे आली आहे. सन्मान वाटावा असं आपल्या देशाचं नाव झालं आहे. अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवणं ही मोठी बाब आहे. देशाच्या प्रगतीबद्दल सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती असते. मी दावोसला गेलो तेव्हा अनेक देशांचे प्रमुख मला भेटले. पण आपल्या देशाबद्दल, आपल्या पंतप्रधानांबद्दल सन्मानाने ते बोलत होते. हे पाहून मला अभिमान वाटला. आपले मराठी बांधवही मला भेटले. याचं फार समाधान असतं. जो काम करेल त्याची लोकप्रियता वाढेलच. मग इतर लोकांची तगमग वाढते. कुणाचा रक्तदाब वाढतो. पण आपल्या देशाचं नाव वाढताना प्रत्येक देशवासीयाला अभिमान वाटला पाहिजे अशी भावना आम्ही मनात ठेवली आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.