शिवसेना हा राज्यात रुजलेला पक्ष असून, पुढील काळात विधायक मुद्दे घेऊन आंदोलने केल्यास आणि त्याला रचनात्मक कार्याची जोड दिल्यास या पक्षाची डरकाळी कायम राहील. गेल्या पाच सात वर्षांत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल सुरू असून, पुढील काळातही त्याला चांगली उभारी मिळेल, असा आशावाद सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याबाबत आपली भूमिका विषद करताना भुजबळ म्हणाले, मुळातच ही संघटना गाव-पाडय़ापर्यंत पोहोचली आहे. शिवसेना हा राज्यात रूजलेला पक्ष असून, चांगले प्रश्न घेऊन आंदोलने केल्यास आणि त्याला रचनात्मक कार्याची जोड दिल्यास या पक्षाचे अस्तित्वच राहीलच पण त्याला पुन्हा नवी उभारी मिळू शकेल. कोणताही करिश्मा नसतानाही उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव यांची सत्ता येऊ शकते, मायावतींचे सरकार येऊ शकते, तर शिवसेनेलाही भविष्यात सत्तेचा सोपान गाठता येईल असेही त्यांनी सूचित केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना, गेली पाच सात वर्षे तेच पक्ष चालवित असल्याचेही भुजबळ यांनी निदर्शनास आणले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा