शिवसेनेने राखी सावंत हिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, असा पलटवार आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी शिवसेनेवर केला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकामध्ये शुक्रवारी अग्रलेखात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते आणि जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे. कारण केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. त्याला अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिले.
चांगल्या लोकांनी राजकारणात यावे, असेच आम्हाला वाटते. शिवसेनेला जर राखी सावंत चांगल्या वाटत असतील, तर त्यांनी राखी सावंत हिलाच मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी द्यावी, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

Story img Loader