जर नरेंद्र मोदींवर प्रेम करणाऱयांनी गुजरातला जायला हवे, तर सोनिया गांधींवर प्रेम करणाऱयांनी इटलीला गेले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना लगावला. राजकीय नेत्यांनी कोणत्याही विषयावर बोलताना भान ठेवले पाहिजे, असेही मत तावडे यांनी व्यक्त केले.
मोदींची स्तुती करणाऱयांनी गुजरातमध्ये जावे, अशा आशयाच्या वक्तव्यावरून अडचणीत सापडलेल्या आपला मुलगा नितेशच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या राणे यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विधीमंडळात कोणताही प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आल्याने हताश झालेल्या भाजपने आता ट्विटचे राजकारण सुरू केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. राणे यांच्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले.

Story img Loader