लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मोसमी पावसाचे पुनरागमन झाले असून राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मुंबईत बुधवारी, तर ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये बुधवार आणि गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जुलै महिन्यातील सुरुवातीचे १५ दिवस पावसाने दडी मारली होती. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत बुधवारी, तर ठाणे , पालघर या जिल्ह्यांमध्ये बुधवार, गुरुवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा… मुंबईवर पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी; पंतप्रधान मोदी व योगी आदित्यनाथ यांचंही घेतलं नाव!

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना शुक्रवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान,रायगड जिल्ह्यात पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

हार्बर, मध्य रेल्वे विस्कळीत

संततधार पावसामुळे हार्बर, तसेच मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १० – १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a possibility of heavy rain in the maharashtra for four to five days mumbai print news dvr