मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिकपासून ते सिंधुदुर्ग कोल्हापूरपर्यंतच्या भागात येत्या तीन दिवसात म्हणजे बुधवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर रत्नागिरी, सातारा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात अधिक राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- मालाड पश्चिम येथे १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मुंबईसह राज्यभरात पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. त्यानंतर गुरुवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल. त्यानंतर तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

सध्या परतीच्या पावसाच्या वेगवान गतीविधीतेसाठी वातावरण अतिशय अनुकूल आहे. येत्या तीन दिवसात राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल. कदाचित गुरुवारपासून राज्यातून यादरम्यान चक्रीवादळाची कोणतीही शक्यता नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.