महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर मुंबईकरांसाठी भव्यदिव्य उद्यान उभारण्यात यावे, त्याला नाव कुणाचे द्यायचा याचा सर्वानी मिळून निर्णय करावा, परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कुणी विरोध करुन नये, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन टर्फ क्लबला भाडेपट्टा वाढवून देऊ नये, त्याचबरोबर रेसकोर्ससाठी नवी मुंबईत जागा द्यावी अशी मागणी केली.
मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा रेसकोर्सच्या नावाने फक्त धनदांडग्यांसाठी उपयोगात न आणता, त्याचा सर्वसामान्यांसाठीही वापर झाला पाहिजे. या जागेवर भव्य असे उद्यान उभारण्यात यावे. मात्र त्याला नाव कुणाचे द्यायचे याचा सर्वानी मिळून चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे आठवले यांनी म्हटले असले तरी, बाळासाहेबांच्या नावाला कुणी विरोध करु नये, असा आग्रहही त्यांनी धरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा