मुंबई : मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरी (पश्चिम) येथील घरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पाईपवर चढून घरात शिरला होता. त्याने सहा हजार रुपयांची चोरी केली होती. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिग्दर्शिकेच्या सदनिकेत बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली होती. तक्रारीनुसार, रविवारी सकाळी सुमारे सव्वातीनच्या सुमारास अज्ञात चोराने पाईपवर चढून घरात प्रवेश केला. त्याने घरातील तीन खोल्यांची पाहणी केली. त्यावेळी घरातील सदस्य झोपले होते. त्याने कुटुंबातील एका सदस्याच्या पाकिटातून सहा हजार रुपये चोरले. घरात पाळलेल्या मांजरामुळे कुटुंबिय जागे झाल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. जोशी यांनी नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०५, ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपी अनिकेत कोंडर याला अटक करण्यात आली. तो अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही जुहू, डी.एन. नगर, वर्सोवा व अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.