लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने झोपेत असलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळीही चोरल्याची घटना रविवारी पहाटे ट्रॉम्बे परिसरात घडली. याप्रकरणी तापसा करून ट्रॉम्बे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली.

ट्रॉम्बे, चित्ता कॅम्प परिसरात रविवारी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. येथे वास्तव्यास असलेल्या बीबीजान शेख एकट्याच घरात होत्या. त्या झोपल्या होत्या. यावेळी खिडकीतून एक चोर त्यांच्या घरात शिरला. मात्र त्याला घरात महागडी वस्तू मिळाली नाही. त्यामुळे त्याने झोपलेल्या बीबीजान यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल घेऊन पळ काढला.

आणखी वाचा-म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ

ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण आणि इतर माहितीच्या आधारे काही तासातच हारून शेख (२०) याला अटक केली. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली.