चोरांकडून पोलिसांवरच गोळीबार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखाद्या चित्रपटातच शोभेल अशा थरार नाटय़ात चोरांनी केलेल्या गोळीबारामुळे काही क्षण पोलिसांची भंबेरी उडाली. मात्र चोरटय़ांपुढे पोलिसांनी सावध भूमिका घेतल्याने सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले, तर याच संधीचा फायदा घेऊन एका वृत्तपत्राची गाडी घेऊन चोरटे पोलिसांच्या हातातून निसटले.
येथील अयोध्यानगरीतील कुश इमारतीमध्ये चोरटे शिरले आहेत, अशी माहिती शुक्रवारी पहाटे परिसरातील एका नागरिकाने टिळकनगर पोलिसांना फोनवरून दिली.
त्यानंतर पोलीस कर्मचारी इसहाक शेख, विश्वास चव्हाण आणि नामदेव ठाकरे या तिघांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याच वेळी इमारतीमध्ये शिरलेल्या तीन चोरांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये त्यांनी इसहाक यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने ते यातून बचावले. या प्रकारामुळे पोलिसांची काहीशी भंबेरी उडाली. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे पळून जाऊ लागले. ते जात असताना गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटय़ांनी त्यांच्या दिशेनेही गोळीबार केला. सुदैवाने दोघेही यातून बचावले.
याच भागात उभ्या असलेल्या एका वृत्तपत्राच्या टेम्पोचालकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरटे त्या टेम्पोतून पळून गेले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चोरटय़ांची कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारही चोरीचीच असल्याची तसेच चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शामराव गायकवाड यांनी दिली.    