वेळ संध्याकाळी साडेसहाची.. बोरीवलीच्या बाभई नाक्याजवळील साई कृपा इमारतीत राहणारे समीर वाघरे कामावरून आपल्या घरी परतले. त्यांना आपल्या फ्लॅटचे दार उघडे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून बाहेरून दार लावून घेतले. त्यामुळे फ्लॅट मध्ये शिरलेले तीन चोर आत बंद झाले.. आणि मग सुरू झाले चोर- पोलीस नाटय़.
काही क्षणांत इमारतीतील लोक जमा झाले. बोरीवली पोलिसही लवाजम्यासह पोहोचले. त्यांनी संपूर्ण इमारतीला वेढा घातला. बघता बघता साई कृपा इमारती भोवती मोठी गर्दी जमली. पोलिसांनी चोरांना बाहेर येण्याचे आवाहन केले. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी आतून दार बंद करून स्वत:ला कोंडून घेतले.
अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी घरात प्रवेश मिळवला आणि त्या तीन चोरांना पकडले. आणि अखेर संध्याकाळी सुरू झालेले हे नाटय़ रात्री साडेआठच्या सुमारास संपल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश साळुंखे यांनी सांगितल़े  विशेष म्हणजे, या काळात चोरांनी घरातून चोरलेला माल पुन्हा आहे जागच्या जागी ठेवून दिला, आणि आम्ही चोरी केली नाही, असे भासविण्याचा प्रयत्नही केला होता़

Story img Loader