लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः गणेश आगमन सोहळ्यानिमित्त रविवारी लालबाग-परळ विभागात झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी अनेकांचे मोबाइल चोरले. नागरिकाचा मोबाइल चोरताना एका सराईत आरोपीसह पाच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सहा मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

लालबाग, परळ विभागातील गणेश कार्यशाळांमध्ये घडविण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या उंच गणेशमूर्तींची शनिवारी आणि रविवारी आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी नागरिकांचे मोबाइल चोरले. गणेश आगमन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन काळाचौकी पोलिसांनी या परिसरात २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी चोरी करण्यासाठी आलेल्या सुमारे पाच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोबाइल जप्त करण्यात आले.

हेही वाचा… रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन पोलीस ठाणी

गर्दीचा फायदा घेऊन चोरीसाठी तेथे आलेल्या कुंदन चंदन दत्तानी (३६) या सराईत चोराला काळाचौकी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा व अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. दत्तानीचा साथीदार नूर अहमद अब्दुल बाकीर इनामदार यालाही काळाचौकी पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा… मुंबई गोवा महामार्ग खरंच सुधारणार? रवींद्र चव्हाणांचा पाचवा दौरा!

आरोपी चिंचपोकळी नाका परिसरात मोबाइल चोरत होते. गणेश आगमन मिरवणूक पाहण्यासाठी येथे आलेले कल्याणमधील रहिवासी वैभव शिंदे यांच्या खिशातील मोबाइल आरोपी चोरत होते. हा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. आणखी एका कारवाईत सुमीत सकपाळ व धर्मवीर कांबळे या दोन तरूणांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. चिंचपोकळी नाक्यावर तक्रारदार दीपक जोहरे यांच्या खिशातील मोबाइल चोरल्याप्रकरणी या आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चोरीला गेलेला ‘वन प्लस’ मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. आगमन सोहळ्यादरम्यान परिसरात मोबाइल चोरी झाल्याच्या सहा तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात गहाळ झालेल्या मोबाइलची संख्या अधिक आहे. पण तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत.

हेही वाचा… मुलुंडमधील एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालय नववर्षात रुग्णांच्या सेवेत; १२ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना होणार लाभ

आगमन सोहळ्यात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी लालबाग परिसरात २०० पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी मिरवणुकांवर लक्ष ठेवले होते. मिरवणुकीमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन लालबाग परिसरातील अनेक मार्गिका वाहतूक पोलिसांनी बंद केल्या होत्या. वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात येत होते.