संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रातील मुलुंड येथील झोपडपट्टीवासियांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले. त्यांना ७ हजार रुपये भरण्यासाठी मुदत दिली जाईल, अशीही माहिती वन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी दिली.
चरणसिंग सप्रा, संजय दत्त यांनी मुलुंड येथील राहुलनगर, शंकर टेकडी, गणेशपाडा आदी परिसरातील शेकडो झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन व अन्य बाबींसंदर्भात लक्षवेधी सूचना दिली होती. सिंधी व पंजाबी निर्वासितांचा समावेश त्यात असून त्यांच्या अडचणी सप्रा यांनी मांडल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. वन अधिकाऱ्यांचे बिल्डरांशी संगनमत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा