मुंबई : पहिल्या प्रवेश यादीच्या तुलनेत दुसऱ्या प्रवेश यादीतही प्रवेश पात्रता गुण हे नव्वदीच्या पारच होते. त्यामुळे तिसऱ्या प्रवेश यादीत प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट होऊन नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. परंतु प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट झालेली नसून दुसऱ्या प्रवेश यादीच्या तुलनेत तिसऱ्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कमालीची स्पर्धा वाढणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी बुधवार, १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या १ लाख ५४ हजार ३५३ जागांसाठी एकूण १ लाख ४४ हजार १८६ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी तब्बल ७५ हजार १४७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. १६ हजार ९७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, ९ हजार ४७८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ७ हजार ६८९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या, “एकनाथ शिंदे गुवाहटीवरून…”

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही, हे पाहता येईल. सदर तिसऱ्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना १२ (सकाळी १० पासून) ते १४ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. नियमित फेरीच्या वेळापत्रकानुसारच कोट्यांतर्गत प्रवेश घेता येणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठातील ६१ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त, अवघ्या १४२ जणांच्या जीवावर विद्यापीठाचा कारभार सुरु

विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.