तानसा आणि त्यापाठोपाठ एमएआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झालेला असतानाच शुक्रवारी सकाळी माजिवाडा नाका येथील गांधीनगर भागातील स्टेमची जलवाहिनी फुटली. या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून त्यासाठी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यात आणखी एक दिवस पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेस स्टेम या पाणीपुरवठा प्राधिकरणाकडून दररोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचे ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर आदी भागांत महापालिकेकडून नियोजन करण्यात येते. शुक्रवारी सकाळी माजिवाडा नाका येथील गांधीनगर भागातील स्टेमची सुमारे ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. ही वाहिनी फुटताच त्यामधून पाणी वाहू लागले आणि काही क्षणात परिसर जलमय झाला.रात्री उशिरापर्यंत वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आलेला ठाणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ही जलवाहिनी १९८७ मध्ये टाकण्यात आलेली असल्याने ती अतिशय जीर्ण झालेली. त्यामुळेच पाण्याच्या दबावामुळे ती फुटली असावी, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
दोन दिवसांपूर्वी भिवंडी परिसरात तानसा पाणीपुरवठा प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्याने मुंबईसह ठाणे शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. तर दुसऱ्या दिवशीही कल्याण येथील काटई नाका भागात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मुंब्रा, दिवा आणि कळवा आदी भागांतील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला होता. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी स्टेमची जलवाहिनी फुटली.
दरम्यान, वागळे इस्टेट भागातील कामगार रुग्णालय परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी येत नसल्याचा आरोप करीत येथील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कामगार रुग्णालय अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. तसेच पाण्यासह अन्य समस्यांबाबतही या वेळी त्यांच्याकडे विचारणा केली.
ही जलवाहिनी १९८७ मध्ये टाकण्यात आलेली असल्याने ती अतिशय जीर्ण झालेली. त्यामुळेच पाण्याच्या दबावामुळे ती फुटली असावी, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा