करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पालिकेकडून वाटप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : मुंबईतील मूकबधिरांसाठी विशेष चिन्हांकित अशा खास मुखपट्टया पालिकेतर्फे देण्यात येणार आहेत. अलीयावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या मदतीने पालिकेने मुखपट्टय़ांची संकल्पना तयार करवून घेतली आहे. अशा मूखपट्टया लवकरच तयार करवून घेतल्या जाणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने या मुखपट्टय़ा देण्याची तयारी केलेली असली तरी तिसरी लाट ओसरल्यानंतर आता या मुखपट्टय़ांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मूकबधिरांना विशेष चिन्हांकित मुखपट्टय़ा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये पालिकेला एका जनहित याचिकेदरम्यान दिले होते. त्यानुसार पालिकेने आता मुंबईतील मूकबधिरांसाठी खास मुखपट्टया देण्याकरीता निविदा मागवल्या आहेत. १३ हजार मुखपट्टया तयार करवून घेतल्या जाणार असून त्याकरिता साधारण ३९ लाख रुपये अंदाजित खर्च आहे. मात्र २०२० मध्ये सुरू झालेल्या करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर या मुखपट्टया मूकबधिरांना मिळणार आहेत.
उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर अलीयावर जंग या संस्थेच्या मदतीने पालिकेच्या नियोजन विभागामार्फत मूकबधिर व्यक्तींची माहिती, संख्या घेण्यात आली. त्यानंतर या संस्थेच्या मदतीने या मुखपट्टीचे चिन्ह ठरवण्यात आले व तशा १२० मुखपट्टया विद्यार्थ्यांकडून पडताळून घेण्यात आल्या. त्यानंतर ही मुखपट्टी न्यायालयात सादर करण्यात आली. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या मुखपट्टयांची निविदा काढण्यास वेळ लागल्याची प्रतिक्रिया नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. दरम्यान, पालिकेने तयार केलेल्या या मुखपट्टीचे न्यायालयाने कौतुक केले असून या मुखपट्टया वापरल्यानंतर मूकबधिरांना गर्दीतही ओळख मिळेल. त्यामुळे त्यांना अडचणीच्या वेळी मदत मिळणेही शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. नियोजन विभागाने तयार केलेल्या नमुना मुखपट्टीप्रमाणे १३ हजार मुखपट्टय़ा बनवून देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. याचा अंदाजे खर्च ३८ लाख ९० हजार ग्राह्य धरण्यात आला आहे. मात्र हा खर्च जास्त दिसत असला तरी मुखपट्टीवर चिन्हाची छपाई करून घेण्याचा खर्च कंत्राटदाराला करावा लागणार आहे. तसेच हा केवळ अंदाजित खर्च असून प्रत्यक्षात खर्च कमी असू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या मुखपटय़ा मिळाल्यानंतर त्या विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत दवाखाना, तसेच आरोग्य केंद्रांद्वारे वितरित केल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.