जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून भाजप आणि घटकपक्षांवर कडाडून टीका करण्यात आली. शिवसेना आणि भाजपची गेल्या २५ वर्षांची युती संपुष्टात येणे अत्यंत दुर्देवी घटना आहे. युती तोडण्याचा निर्णय म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान करणारा असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. भाजप आणि घटकपक्षांसोबतची युती टिकवण्यासाठी शिवसेनेकडून अखेरपर्यंत खरेखुरे प्रयत्न करण्यात आल्याचे या अग्रलेखात सांगण्यात आले आहे. युती तुटल्यामुळे भविष्यात काय होणार, हे माहित नाही. परंतु, सत्तेचे राजकारण आणि गणितांमुळे महाराष्ट्राच्या भविष्याला धोका पोहचू नये एवढीच अपेक्षा असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कालपर्यंत एका तंबूत पाया पडणारे आता दुसऱ्या तंबूत नमाज पडतील, असे सांगत शिवसेनेने घटकपक्षांवरही निशाणा साधला आहे. तेव्हा विचार, निष्ठा या शब्दांना तसे काही मोलच उरलेले नाही हे पटते, अशा शब्दात त्यांनी महादेव जानकर आणि इतर मित्रपक्षांना सुनावले आहे.
युती तोडणाऱ्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान- शिवसेना
जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून भाजप आणि घटकपक्षांवर कडाडून टीका करण्यात आली.

First published on: 26-09-2014 at 10:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This breaking of alliance is an insult to the 105 marathi martyrs of the samyukta maharashtra movement an editorial in sena mouthpiece saamana said here