राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांसाठीचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यसरकारने केलेल्या तरतुदी आणि सवलती पाहता अजित पवारांचे हे अर्थसंकल्पीय भाषण नसून निवडणूकीचे भाषण असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस ट्विटर अकाऊंटवर म्हणतात, राज्याच्या मुलभूत प्रश्नांवर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हे बजेट नसून निवडणुकीचे भाषण आहे. सिंचन, शेती, रोजगार आणि शहरीकरणाचे प्रश्न दुर्लक्षीत आहेत असेही फडणवीस म्हणाले. तसेच यावेळीचा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प असल्याच्या जाणीवेतूनच अर्थमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्य सरकार सध्या कर्जात डूबले असताना घोषणांचा पाऊस पाडणे म्हणजे तिजोरीत ठणठणाट पण घोषणा जोरात अशी या आघाडी सरकारची लक्षण असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
तिजोरीत ठणठणाट पण घोषणा जोरात- देवेंद्र फडणवीस
राज्याच्या मुलभूत प्रश्नांवर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हे बजेट नसून निवडणुकीचे भाषण आहे.
First published on: 25-02-2014 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This budget is announced on the occasion on election devendra fadnavis