राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांसाठीचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यसरकारने केलेल्या तरतुदी आणि सवलती पाहता अजित पवारांचे हे अर्थसंकल्पीय भाषण नसून निवडणूकीचे भाषण असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस ट्विटर अकाऊंटवर म्हणतात, राज्याच्या मुलभूत प्रश्नांवर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हे बजेट नसून निवडणुकीचे भाषण आहे. सिंचन, शेती, रोजगार आणि शहरीकरणाचे प्रश्न दुर्लक्षीत आहेत असेही फडणवीस म्हणाले. तसेच यावेळीचा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प असल्याच्या जाणीवेतूनच अर्थमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्य सरकार सध्या कर्जात डूबले असताना घोषणांचा पाऊस पाडणे म्हणजे तिजोरीत ठणठणाट पण घोषणा जोरात अशी या आघाडी सरकारची लक्षण असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा