आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसतानाही, केंद्रातील युपीए सरकार चुकीची माहिती पसरवून माझ्या व भाजपच्या प्रतिमेस धक्का पोहोचवत आहेत, असा आरोप नितीन गडकरी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देताना जारी केलेल्या एका निवेदनात केला. कोणत्याही स्वतंत्र चौकशीस आपण तयार आहोत असे मी नेहमीच सांगत आलो असून केंद्र सरकारच्या या कृतीविरुद्ध मी राजकीय आणि कायदेशीर पातळीवरून लढा देत राहीन, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.  केंद्र सरकारच्या अशा कारवायांचा विपरीत फटका पक्षाला बसावा अशी माझी इच्छा नाही.
माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील माझे सहकारी आणि पक्षाचे असंख्य कार्यकर्त्यांनी मला दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी असून पक्षाचा कटिबद्ध कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी पक्षकार्य करत राहीन, असे गडकरी यांनी या निवेदनात म्हटले आहे.
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष अशा भूमिकेतून पक्षाची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून समाजातील दुर्बल घटकांसाठी, विशेषत शेतकऱ्यांसाठी काम करण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

Story img Loader