मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक पदवी प्रदान समारंभ मंगळवार, ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात होणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यंदा ४०१ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी.) प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना २० पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा विद्याशाखीय पदव्यांनुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८६ हजार ६०१, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४७ हजार १४, मानव्यविज्ञान विद्याशाखा २२ हजार ५८३ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ८ हजार २६७ एवढ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील ४०१ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २३०, वाणिज्य व व्यवस्थापन ८०, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी ५१ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ४० एवढ्या पदव्यांची संख्या आहे.

assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Torres scam
दागिने बनविणाऱ्या ‘टोरेस’च्या कार्यालयांबाहेर गर्दीमुळे तणाव; विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!
PET, LLM, Pre-Entrance Examinations, Mumbai University,
मुंबई विद्यापीठाकडून ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठी नावनोंदणी सुरू, ‘एलएलएम’, ‘पेट’ची प्रवेशपूर्व परीक्षा ‘या’ तारखांना
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!

गतवर्षी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत जवळपास १.५० लाख विद्यार्थ्यांना पदवी आणि ४२५ स्नातकांना ‘पी.एचडी.’ प्रदान करण्यात आली होती.महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विविध विभागांचे अधिकारी व सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या ‘University of Mumbai’ युट्यूब वाहिनीवरून करण्यात येणार आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : झोपु प्राधिकरणाकडून आतापर्यंत २५०० झोपड्या रिकाम्या

हेही वाचा – मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे

मुलींची संख्या सर्वाधिक

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ८५ हजार ५११ मुली तर ७८ हजार ९५४ मुलांचा समावेश आहे. यामध्ये पदवीपूर्व विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३९ हजार १८४ एवढी असून पदव्युत्तरसाठी २५ हजार २८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीपूर्व स्तरावर ७० हजार ५२३ एवढ्या मुलींचा समावेश असून, ६८ हजार ६५२ मुलांचा समावेश आहे. पदव्युत्तर स्तरावर १४ हजार ९७९ एवढ्या मुलींचा समावेश असून १० हजार ३०२ एवढ्या मुलांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १५ मुली व ३ मुलांना पदके देऊन गौरविण्यात येईल.

Story img Loader