काही वर्षी ३० जून किंवा ३१ डिसेंबर या दिवशी रात्री १२ वाजता आण्विक घडय़ाळे एका सेकंदासाठी थांबवून पृथ्वीची गती आणि आण्विक घडय़ाळे यांच्यातील वेळ जमवून घेतली जाते. एक सेकंद घडय़ाळ थांबवून या वेळ जमवण्याच्या क्रियेला लीप सेकंद असे म्हणतात. मात्र या वर्षी ३१ डिसेंबर रोजी तसे करावे लागणार नाही, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
आण्विक घडय़ाळे आणि पृथ्वीची गती यांच्यात फरक असतो. आण्विक घडय़ाळे यंत्रबरहुकूम अचूक वेळ दर्शवतात. मात्र पृथ्वीची गती तेवढी अचूक नाही. त्यामुळे ३० जून किंवा ३१ डिसेंबरच्या रात्री या दोन्हींमधील वेळ जमवावी लागते. यापूर्वी ३० जून २०१२ रोजी हा लीप सेकंद जमवून घेण्यात आला होता. १९७२ पासून आतापर्यंत २५ वेळा लीप सेकंद जमवून घेण्यात आला आहे, अशी महिती त्यांनी दिली.
यंदा लीप सेकंद नाही!
काही वर्षी ३० जून किंवा ३१ डिसेंबर या दिवशी रात्री १२ वाजता आण्विक घडय़ाळे एका सेकंदासाठी थांबवून पृथ्वीची गती आणि आण्विक घडय़ाळे यांच्यातील वेळ जमवून घेतली जाते.
First published on: 30-12-2013 at 02:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year no leap second