मुंबई / पुणे : अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला असून, गेल्या चार वर्षांतील हा नीचांक आहे. त्याचबरोबर ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्यमंडळ) दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाली असून गेल्यावर्षी ९६. टक्के निकाल जाहीर झाला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेत १ लाख ६२ हजारांनी घटली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा न होता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला होता.१५१ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी राज्यातील १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले असून, त्यातील १०८ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
विभागनिहाय निकाल
- ९८.११% कोकण विभाग
- ९५.६४% पुणे
- ९२.०५% नागपूर
- ९३.२३% औरंगाबाद</li>
- ९३.५५% मुंबई
- ९६.७३% कोल्हापूर</li>
- ९३.२२% अमरावती</li>
- ९२.२२% नाशिक
- ९२.७६% लातूर