मुंबईः मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला धमकीचा दूरध्वनी आला असून येत्या एक – दोन दिवसांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दहशतवाद्यांशी संबंध असणारी व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे या दूरध्वनीवरून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा दूरध्वनी आला होता. एक-दोन दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमाला दहशतवाद्यांशी संबंध असणारी व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे दूरध्वनीवरून सांगण्यात आले. यावेळी विचारणा केली असता आपण कांदिवली येथून बोलत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. या घटनेनंतर मंत्रालय नियत्रण कक्षाने तात्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेसह इतर यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली.

हेही वाचा… धक्कादायक! दादर स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून महिलेला ढकललं, आरोपीला पोलिसांनी केली अटक

दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा… अवमानाबाबतच्या याचिकेतून संभाजी भिडेंचे नाव वगळा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना आदेश

पोलिसांना येणाऱ्या धमकीच्या दूरध्वनीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच मुंबई व दिल्ली विमानतळावर घातपाती कारवाई होणार असल्याचा दूरध्वनी हरियाणा पोलिसांना आला होता. त्याप्रकरणी पॉन्डीचेरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच लोकलमध्ये साखळी स्फोट घडविण्याची दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्याला रविवारी जुहू पोलिसांनी अटक केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat call to mantralaya police control room about persons having links with terrorists mumbai print news asj