मुंबईः आंतरराष्ट्रीय तीन विमानांमध्ये आरडीएक्ससह दहशतवादी शिरल्याची धमकी दिल्याची घटना ताजी असताना आता देशांतर्गत दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी विमान कंपनीला प्राप्त झाली आहे. दरभंगाहून मुंबईला, तसेच लेहहून दिल्लीला जाणाऱ्या दोन विमानांमध्ये बॉम्बची ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ट्वीटर हॅन्डलद्वारे धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत आहे.

तक्रारदार धनंजय नारायणराव गावडे (५४) स्पाईस जेटमध्ये ड्युटी मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचे @flyspicejet या नावाने अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हॅन्डल आहे. त्याचे काम गुडगाव येथे चालते. स्पाईज जेटचे स्टेशन मॅनेजर राजन प्रभाकर यांनी संदेश पाठवून त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स हॅन्डलवर Psychward या एक्स हँडलवरून धमकीचा संदेश आल्याचे सांगितले. त्यात एसईजे ११६ व एसईजे १२४ या विमानांमधील बॉम्बचा लवकरच स्फोट होणार आहे. प्रवाशांना लवकर खाली उतरवा, अशा प्रकारची धमकी असलेला मजकुर त्यात लिहिला आहे. या धमकीच्या ट्विटमध्ये दरभंगा येथून मुंबईला जाणाऱ्या एसई जे ११६ व लेहहून दिल्लीला जाणाऱ्या एसईजे १२४ या विमानांची नावे नमुद करण्यात आली होती.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

हेही वाचा – वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज

हेही वाचा – Baba Siddique Killing: “व्हीआयपी आमचं ऐकतच नाहीत”, सुरक्षा अधिकाऱ्यांची तक्रार; मांडल्या ‘या’ अडचणी!

दरम्यान, दरभंगा – मुंबई विमानाने उड्डाण केले होते. त्यामुळे मुंबई विमानतळाला याबाबतची माहिती देण्यात आली. बुधवारी दुपारी टर्मिनल मॅनेजर, बीडीडीएस, सीआयएसएफ कंट्रोल, जॉईट सेंट्रल कंन्ट्रोल, यांना याबाबतची माहिती देण्यात आली. विमान मुंबईत पोहोचल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तसेच त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. विमानाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. त्यावेळी एअरलाईन्स सेक्युरीटी टीम, एअरक्राफ्ट मेंटेन्सस इंजिनीयर उपस्थित होते. त्यांनी सुमारे एक तास विमानाची तपासणी केली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटक किंवा बॉम्बसदृष्य वस्तू सापडली नाही. पण या घटनेमुळे विमानतळावर, तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे गावडे यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एक्स या समाज माध्यमांकडून धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एक्स खात्याची माहिती घेण्यात आली आहे. त्याद्वारे पोलीस तपास करीत आहेत.