लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाला गुरूवारी रात्री एक धमकीचा ई-मेल आला असून त्यात ई-मेल रशियातून आल्याचे भासवण्यात आले आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी रिझर्व बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तैयबाचे सीईओ असल्याचा दावा केला होता.

Delhi Schools Receive Bomb Threat
Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war
TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत
anjali Damania
Anjali Damaniya : “मला रोज ७००-८०० फोन, माझ्यावर अश्लील कमेंट्स”, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानियांचा आरोप!
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत
RBI introduces beneficiary account name look-up facility to secure digital transactions.
RTGS, NEFT Transactions : आता चुकूनही जाणार नाहीत चुकीच्या खात्यात पैसे, NEFT आणि RTGS वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचे मोठे पाऊल
Digital Arrest
Digital Arrest Scam : डिजीटल अरेस्ट करून १७ लाखांची फसवणूक; रशियन नागरिकाला अटक
devendra Fadnavis
Suresh Dhas Meet CM : सुरेश धसांचं निवेदन अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, भेटीत नेमकं काय ठरलं?

रिझर्व बँकेचे सुरक्षा रक्षक गोपाळ चौहान यांच्या तक्रारीवरून एमआरए पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुरूवारी दुपारी आलेल्या या ई-मेलमध्ये रशियन भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यात स्फोटकांनी आरबीआय बँक उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी सर्व यंत्रणांना सतर्क केले असून ई-मेलच्या माध्यमातून गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत आहे. यापूर्वी रिझर्व बँकेला असा धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तैयबाचे सीईओ आहे, असे सांगून अचानक फोन ठेवला. “बँकबंद करा. मोटरगाडी धडक देणार आहे “, अशीही आरोपीने धमकी दिली. ही धमकी गंभीरतेने घेऊन रिझर्व बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रामाबाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-हाँगकाँगमधून आलेल्या वृद्धाला मुंबईत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून डिजिटल अरेस्ट

गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीच्या लग्नात बॉम्ब असल्याचे ट्वीट करणाऱ्याला नुकतीच मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. हे ट्वीट १३ जुलैला करण्यात आले होते. दरम्यान, सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली होती. याप्रकरणी विरल आसरा या तरूणाला अटक करण्यात आली होती. तो खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी आयटी इंजिनीअर होता. तर १३ मेला एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून असलम अली कराची पाकिस्तानमधून ३५० किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आला आहे. तो महालक्ष्मी, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानाकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. तपासाअंती हा दूरध्वनी खोटा असल्याचे स्पष्ट झाले होते.

Story img Loader