मुंबई : मोबाईल चोरल्यानंतर त्यातील खासगी चित्रफीत समाज माध्यमांवर सर्वदूर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार विवाहित असून तो कुटुंबियांसह विरार येथे राहतो. गेल्या ४ वर्षांपासून खाद्यपदार्थ वितरणाचे काम तो करतो. अंधेरी पश्चिम येथे ३ जुलैला खाद्यपदार्थांचे वितरण करण्यासाठी तो आला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल दुचाकीवर लावला होता. तो अनोळखी व्यक्तीने चोरला. याप्रकरणी तक्रारदाराने अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर २६ जुलैला तक्रारदार घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अहमद खान ऊर्फ नूर खान असल्याचे सांगितले. त्याला तक्रारदाराचा चोरी झालेल्या मोबाईलमधील मेमरी कार्ड मिळाले असून त्यात तक्रारदार व पत्नीची खासगी ध्वनीचित्रफीत असल्याचे त्याने सांगितले.

sebi press release marathi news
कर्मचाऱ्यांपुढे ‘सेबी’चे अखेर नमते, प्रसिद्धी पत्रक मागे घेण्याचा नियामकांवर प्रसंग
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Cyber ​​fraud in the name of deleting obscene videos on social media Mumbai
समाज माध्यमावरील अश्लील चित्रफीत हटवण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
sndt canceled published recruitment advertisement due to doubtful in reservation provisions
पद भरतीची जाहिरात रद्द, उमेदवारांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
woman forcing orphanage girls into prostitution
देहविक्रीस प्रवृत्त करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा; सेक्स रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ

हेही वाचा – मुंबई : सुमारे आठ कोटींच्या कर फसवणुकीप्रकरणी कंपनीसह दोघांविरोधात गुन्हा

हेही वाचा – मुंबई : कामाठीपुऱ्यात ५८ मजली पुनर्वसित इमारती, तर विक्री योग्य इमारती असणार ७८ मजल्याच्या

आपल्याला एक लाख रुपये न दिल्यास मी सर्व ध्वनीचित्रफीत सर्वदूर प्रसारित करेन, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर आरोपी खान तक्रारदाराला नियमीत दूरध्वनी करत होता. त्याने ३० जुलैला दूरध्वनी करून तक्रारदाराला वाकोला पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या स्वागत बार बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तक्रारदार तेथे गेले असता आरोपी तेथे आला. त्याने मोबाईलवर त्याचे व पत्नीची ध्वनीचित्रफीत दाखवली. त्या चित्रफीतीसाठी आपल्याला दुसरीकडून दोन लाख रुपये मिळत असल्याचे आरोपीने सांगितले. त्याच्या धमकीला घाबरून तक्रारदाराने त्याला पैसे देण्यास होकार दिला. तसेच १० दिवसांची मुदत मागून घेतली. पण तक्रारदाराने याप्रकरणी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.