मुंबई : रोख रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अंधेरी रेल्वे स्थानकात तीन आरोपींनी एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केली. ५० लाख रुपयांऐवजी खेळण्यातील नोटा संबंधित व्यक्तीला दिल्या. तसेच या प्रकरणात अंधेरी रेल्वे पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडताना निष्काळजीपणा व नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून आरोपी आणि तक्रारदारांची पैशांबाबत चर्चा सुरू होती.
तुम्ही जेवढे पैसे आणाल, त्याच्या दुप्पट पैसे दिले जातील, असे आरोपींनी तक्रारदाराला सांगितले. या आमिषाला तक्रारदार बळी पडले. आरोपी ४ फेब्रुवारी रोजी अंधेरी स्थानकात एका बॅगेतून ५० लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटा घेऊन आले. या वेळी कर्तव्यावरील दोन रेल्वे पोलिसांनी आरोपीची बॅग उघडली असता, त्यात मोठ्या संख्येने ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. नोटांच्या प्रत्येक बंडलत वर खरी व आतमध्ये खेळण्यातील नोटा तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही.
रेल्वे पोलिसांकडून पैशांची मागणी ?
अंधेरी स्थानकात संबंधित व्यक्तीच्या बॅगेची रेल्वे पोलिसांनी तपासणी केली. या वेळी बॅगेत लाखो रुपये असल्याचे समजताच, महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी संबंधिताकडे पैशाची मागणी केली. मात्र, तपासणीत खेळण्यातील नोटा असल्याचे समजताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिळेपर्यंत गुन्ह्याची उकल होणार नाही. आरोपींशी संबंधित दोन व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तसेच रेल्वे पोलिसांनी बॅगेची तपासणी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले.
मनोज पाटील, उपायुक्त, लोहमार्ग
याप्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच आरोपींचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणात रेल्वे पोलिसांचा सहभाग आढळलेला नाही. तसेच यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी निर्णय घेतील.नितीन लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे</p>
कर्तव्यावर असताना, नियमभंग करून रेल्वे पोलिसांची कार्यवाही
अंधेरी रेल्वे स्थानकात संबंधित व्यक्ती बॅग घेऊन जात असताना, त्याला दोन पोलिसांनी पकडले. त्यानंतर, नियमांचा भंग करून, त्याची बॅग तपासण्यात आली. यावेळी बॅगेत लाखो रुपये असल्याचे समजताच, महिला आणि पुरूष अशा दोन पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे पैशाची मागणी केली. मात्र, दोघांनी बॅगेची पूर्ण तपासणी केली असता, खेळण्यातील नोटा असल्याचे सिध्द झाल्यानंतर, त्यांनी तेथून काढता पाय घेतला. परंतु, बॅग तपासणीदरम्यान नियमाचे उल्लंघन केले. आजघडीला या दोन्ही पोलिसांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर कारवाईचा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिसाने दिली.