मुंबई : मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात विनयभंग आणि बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. यातील तिन्ही आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून तर एका आरोपीला नवी मुंबई येथून अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

घाटकोपर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाला लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने बलात्कार केला होता. त्याबाबत मुलीच्या आईने महिन्याभरापूर्वी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र, आरोपीला त्याची कुणकुण लागताच तो पसार झाला. अखेर पोलिसांनी शनिवारी आरोपीला नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचा >>> जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी

अशाच प्रकारे २०२३ मध्ये मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने राजस्थान येथे पळ काढला होता. गेल्या वर्षभरापासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, हा आरोपी त्याच्या गावी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मानखुर्द पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन त्याला अटक केली आहे. तर तिसऱ्या घटनेत मानखुर्द पोलिसांनी उत्तर प्रदेश येथूनच एका आरोपीला चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्याने देखील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून उत्तर प्रदेश येथे पळ काढला होता.