मुंबईः १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना कुरार पोलिसांनी अटक केली. बलात्कार व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३७६, ३७६(४)(३) सह बालकांचे लांगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ६, ८ ,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
हेही वाचा >>> सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२२ पासून २८ मे २०२३ या कालावधीत मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. अटक आरोपीपैकी दोघे भाऊ आहेत. आरोपी भावांनी डिसेंबर २०२२ मध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर तिसऱ्या आरोपीने प्रेमसंबंध प्रस्तापित करून २८ मे, २०२३ रोजी तिच्यावर अत्याचार केला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी २२ वर्ष ते २७ वर्ष वयोगटातील आहेत.