लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सुमारे दोन हजार किलो गांजा तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उडिसामधून अटक केलेल्या वितरकाची तीन बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आरोपी उडीसा येथील नक्षल प्रभावीत परिसरात गांजाची शेती करून आरोपी त्याचे देशभरात वितरण करीत होता. आरोपी महाराष्ट्रातील सर्वात मोठा गांजा वितरक असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे.

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या घाटकोपर कक्षाने २०२१ मध्ये मुंबई – ठाणे महामार्गावर विक्रोळीजवळ सापळा रचून एका ट्रक पकडला होता. तपासणीत ट्रकमध्ये नारळांच्या खाली छुपी जागा तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यात १८२० किलो गांजा लपवण्यात आला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आकाश यादव, संदीप सातपुते आणि दिनेश सरोज यांना अटक केली. याप्रकरणी मुख्य आरोपी लक्ष्मीकांत राम प्रधान ऊर्फ लक्ष्मीभाई व त्याचा साथीदार विद्याधर प्रधान यांना उडिसातून अटक करण्यात आली. उपायुक्त (एएनसी) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने उडिसामध्ये सापळा रचून त्याला अटक केली. त्याची तीन बँक खाती गोठवण्यात आली असून त्यात सुमार तीन लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

आणखी वाचा-प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकामे ठप्प

अंमली पदार्थांच्या विक्रीतील व्यवहार रोखीवर चालत असल्यामुळे त्याच्या बँक खात्यात कमी रक्कम सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितेल. आता आरोपीच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी बोईसर, उडीसा व हैदराबाद येथे लवकरच पथक पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी लक्ष्मीकांत २०१५ पासून उडिसा येथील मलकनगिरी, कोरापुट, कंदमाळ, कलाहंदी नवापोडा या डोंगराळ भागात गांजाची शेती करीत होता. हा गांजा ब्रम्हपूर येथे आणण्यात येत होता. तेथून त्याचे वितरण महाराष्ट्रात करण्यात येत होते. आंध्र प्रदेशातून नारळ आणण्याची बतावणी करून तो भाड्याने ट्रक घ्यायचा. यानंतर ट्रक आंध्र प्रदेशच्या सीमेपर्यंत जायचा. तिथे लक्ष्मीकांत, राम प्रधानचे साथीदार ट्रकचा चालक आणि सहाय्यकाला एखाद्या हॉटेलमध्ये थांबवून त्यांचा मोबाइल आपल्याकडे घ्यायचे. यानंतर तो ट्रक स्वत: चालवत अज्ञात स्थळी घेऊन जात आणि त्यात गांजा लपवत होते. त्यानंतर त्यावर नारळ ठेवण्यात येत होते. गांजा ओदिशाहून यायचा. मग ट्रक चालक तो हैदराबाद, पुणे आणि सोलापूरमार्गे मुंबईत आणायचे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three bank accounts of the states biggest ganja distributor were frozen mumbai print news mrj
Show comments