लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या गोवंडीमधील एका शिधावाटप दुकानावर शिवाजी नगर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. पोलिसांनी दुकानदार आणि तांदूळ घेऊन जाणाऱ्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस

आणखी वाचा-२२ हजारहून अधिक दहशवाद्यांची माहिती संकलित! ‘एनआयए’चा नवा डेटाबेस कार्यान्वित

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील लोटस कॉलनी येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४४/ई/४८ वर ही कारवाई करण्यात आली. या दुकानातून काही जण मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्या घेऊन एका मोटरगाडीत भरत असल्याचे एका महिलेने पाहिले. तिने तत्काळ याची माहिती शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली. याबाबत माहिती मिळताच शिधावाटप अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. शिधावाटप अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिधावाटप अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.