डॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवडी पोलिसांनी मंगळवारी पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली. या तिघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ४ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या संरचनेत बदल करणाऱ्या मेहता यांना अटक केली होती. पोलिसांनी मंगळवारी पालिकेचे उपअधीक्षक डॉ. पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक अभियंता राहुल जाधव आणि बाजार निरीक्षक जमील काझी यांना अटक केली. सदोष मनुष्यवधाबरोबरच कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप या तिघांवर आहे. विशेष म्हणजे इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेतर्फे चव्हाण यांनीच पहिली तक्रार नोंदवली होती.

Story img Loader