मुंबईहून सुरतकडे निघालेल्या फ्लाइंग राणीचे तीन डबे सोमवारी दुपारी मुंबई सेंट्रल यार्डात घसरले. या दुर्घटेत कोणीही जखमी झाले नसले तरी फ्लाइंग राणी तब्बल एक तास उशीराने सुरतला रवाना झाली.
दुपारी ४.४० वाजण्याच्या सुमारास मुंबई सेंट्रल यार्डातून रेल्वे स्थानकाकडे येत असताना अचानक तिचे तीन डबे रूळावरून खाली घसरले. फ्लाइंग राणीची सुरतकडे रवाना होण्याची वेळ ५.५० होती. मात्र घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्यामध्ये तब्बल ४०-४५ मिनिटे गेल्यामुळे गाडी एक तास उशीराने सोडण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader