धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठीच्या जारी करण्यात आलेल्या निविदांना अखेर चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदा बुधवारी खुल्या करण्यात येणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास २००४ पासून रखडला आहे. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने (डीआरपी) २ ऑक्टोबर रोजी चौथ्यांदा निविदा काढण्याल्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मागविण्यात आलेल्या या निविदेसाठी आयोजित करण्यात आलेल्या निविदापूर्व बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी आंतरराष्ट्रीत स्तरावरील कंपन्यांसह एकूण आठ जणांनी या प्रकल्पासाठी उत्सुकता दाखवली. त्यामुळे प्रत्यक्षात किती निविदा सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ३० ऑक्टोबर रोजी किती निविदा सादर झाल्या हे स्पष्ट होणार होते. मात्र डीआरपीने निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने ही प्रक्रिया लांबली होती.

Services sector hit by slowdown, PMI hits two-year low
सेवा क्षेत्राला गतिरोधाची बाधा ‘पीएमआय दोन वर्षांच्या नीचांकी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
builders January
वर्षाची सुरुवात बांधकाम व्यावसायिकांसाठी सकारात्मक, मागील १३ वर्षांतील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Pune Municipal Corporation , Tax , Elections ,
पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य

हेही वाचा : जॉन्सन्सच्या बेबी टाल्कम पावडरच्या निर्मितीस उच्च न्यायालयाची परवानगी मात्र…

निविदा सादर करण्याची मुदत मंगळवारी संपली असून शेवटच्या दिवसांपर्यंत तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. मात्र या तीन कंपन्या नेमक्या कुठल्या आहेत, त्यांची नावे काय आहेत यासंबंधीची माहिती उपलब्ध झालेली नाही. बुधवारी निविदा खुल्या झाल्यानंतर या तीन कंपन्यांची नावे समोर येतील, असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या तीन कंपन्या नेमक्या कोणत्या, पुढे निविदेच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार आणि मुंबईतील सर्वात मोठा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोण राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : नवाब मलिक यांच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करा; वाशीम जिल्हा न्यायालयाचे आदेश

सल्लागारासाठीही तीन निविदा
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या व्यवस्थापनसाठी सल्लागाराची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी डीआरपीने निविदा मागविल्या होत्या. या निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. निविदापूर्व बैठकीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील ११ कंपन्यांनी निविदेसाठी उत्सुकता दर्शविली होती. आता सल्लागाराच्या निविदा खुल्या झाल्या असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. मंदार केळकर, जॅग डिझायनर्स आणि संदीप शिर्के या तीन कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

Story img Loader