खोटा अहवाल सादर करू नये यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडे सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या जी/उत्तर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून अटक केली. यापैकी दोघांना रंगेहाथ तर एकाला दादर येथील कार्यालयातून अटक करण्यात आली.
मंगेश कदम, राकेश पाटील, स्वप्नील राणे अशी या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. दादर विभागात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना हिवताप झाला आहे की नाही त्याची तपासणी करून त्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला सादर करण्याचे काम फिर्यादी करतात. त्या बदल्यात बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांना मोबदला देण्यात येतो. एप्रिल-२०१२ मध्ये या तिघांनी फिर्यादीकडे बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापैकी ५० टक्के रक्कम आपल्याला द्यावी अन्यथा वरिष्ठांना तुमच्या विरोधात खोटा अहवाल सादर केला जाईल, असे सांगून सात हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांची मागणी पूर्ण केली.
तिघा जणांनी या महिन्यात पुन्हा फिर्यादीकडे सात हजार रुपयांची मागणी केली तेव्हा फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दादर येथे सापळा रचला आणि फिर्यादीकडून सात हजार रुपयांची लाच घेताना कदम आणि पाटील यांना रंगेहाथ पकडले तर राणे या कर्मचाऱ्याला दादर येथील कार्यालयातून अटक करण्यात आली.
सात हजारांच्या लाचेप्रकरणी पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक
खोटा अहवाल सादर करू नये यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडे सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या जी/उत्तर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून अटक केली.
First published on: 16-02-2013 at 04:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three corporation employee arrested while taking bribe