मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख १० हजार ४८२ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडे ५ लाख ६६ हजार ४४२ अर्ज आले आहेत.

हेही वाचा >>> बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ

पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क २० ते २७ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत भरता येणार आहे. दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी २८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता जाहीर होईल आणि हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क ३० जून ते ५ जुलै (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत भरायचे आहे आणि पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क ७ ते १० जुलै या कालावधीत भरणे बंधनकारक असेल. पदवीच्या प्रथम वर्षात विविध अभ्यासक्रमांसाठी होणारे सर्व प्रवेश आणि शैक्षणिक उपक्रम ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी घालून दिलेल्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वांनुसारच होणार आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांना सदर प्रवेश प्रक्रियेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि मंजूर केलेल्या जागांनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असेल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

Story img Loader