मुंबईत चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण सेप्टीक टँकमध्ये पडले. त्यातील एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले असून एक महिला आणि लहान मुलगा अजूनही आत अडकला आहे.

अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बुधवारी सकाळी चेंबूर वाशी नाका म्हाडा कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. जमिनीखाली हा सेप्टीक टँक बांधण्यात आला आहे.

Story img Loader