कांदिवली येथे एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या तीन मित्राना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.
 कांदिवलीच्या एकता नगर येथे राहणारी प्रियांका पंडय़ा (नाव बदलले आहे) सफीक वागवा या मित्रासोबत एका हॉटेलात बुधवारी रात्री जेवण्यासाठी गेली होती. त्यावेळी सफीकचे दोन मित्र असिक शेख आणि सुल्तान शेखसुद्धा तेथे पोहोचले. सफीकने प्रियांकाची व त्यांची ओळख करून दिली. जेवणानंतर गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्यांनी प्रियांकाला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्यांनी प्रियांकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून सुटून प्रियांकाने कांदिवली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा