मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या (उत्तर)च्या मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवार मध्यरात्री १:१० ते पहाटे ४:१० वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असेल. या कामामुळे काही लोकलच्या वेळेवर परिणाम होणार आहे. तर, काही लोकल मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान रद्द केल्या जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री १.१० वाजता पोहोचेल. ही विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल. विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री ११.४९ वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. बोरिवली-चर्चगेट लोकल बोरिवलीहून रात्री १२:१० वाजता निघेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल.

हेही वाचा…सीएसएमटी येथे शुक्रवार-शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; लोकल, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

बोरिवली-चर्चगेट लोकल बोरिवलीहून रात्री १२:३० वाजता निघेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. चर्चगेट-विरार लोकल, चर्चगेटहून पहाटे ४.१५ वाजता सुटणारी लोकल मुंबई सेंट्रलवरून पहाटे ४.२५ वाजता सुटेल. चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेट येथून पहाटे ४.१८ वाजता सुटण्याऐवजी मुंबई सेंट्रलवरून पहाटे ४.२८ वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three hour block between churchgate to marine lines station for wankhede flyover gurder work mumbai print news psg