चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील एका चाळीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास दोन घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेसह तीन जण जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुनाभट्टीतील डोंगराळ भागातील नागोबा चौक परिसरातील एक मजली नारायण हडकर चाळीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत प्रकाश सोनावणे (४०), शुभम सोनावणे (१५) आणि सुरेखा वीरकर (२८) हे तिघे जखमी झाले. या तिघांनाही शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून ही चाळ रिकामी करण्यात आली.