देवनार येथील चिता कॅम्प परिसरात सोमवारी दुपारी एक रिक्षा बेस्ट बसवर धडकून झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अणुशक्तीनगर ते ट्रॉम्बे दरम्यान धावणारी बेस्ट बस क्रमांक ३६४ दुपारी ३.३० च्या सुमारास चिता कॅम्प परिसरातून जात असताना समोरुन भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक मोहम्मद इसाक दौलत बादशहा (२१) आणि रिक्षामधील प्रवासी पील अहमद सलियानी (४९) व डी. डी. उबाळे (४८) जखमी झाले. जखमींना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या जखमींना सायन रुग्णालयात हलविण्यात आले. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेस्टच्या नियंत्रण कक्षातील सूत्रांनी दिली.

Story img Loader