परळ येथील पुलावर सकाळच्या वेळेस एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. डम्पर आणि दुचाकीची धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. एका दुचाकीवरून दोन तरूणी आणि एक तरुण प्रवास करत होते. या दुचाकीची डम्परला धडक होऊन तिघांचाही अपघातस्थळी मृत्यू झाला. भोईवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परळ येथील पुलावरून मंगळवारी पहाटे एका दुचाकीवरून एक तरूण व दोन तरूणी जात होते. दुचाकीचालकाचे दुचाकीरवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर धडकली. दुचाकी दुभाजकावर धडकताच तिघेही विरूद्ध दिशेच्या रस्त्यावर फेकले गेले. त्यावेळी समोरून येणाऱ्या डम्परने या तिघांना धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी परळ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अपघातात ठार झालेला तरूण ॲन्टॉप हिल परिसरात वास्तव्यास होता. तो या मुलींना घरी सोडण्यासाठी जात होता. याप्रकरणी परळ येथील भोईवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत

या अपघाताबद्दलची अधिक माहिती अपडेट होत आहे…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in a accident on parel bridge in mumbai kvg