मुंबईः दहिसर व मालाड येथे रविवारी घडलेल्या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. याप्रकरणी दहिसर व कुरार पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी दोन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिला अपघात मालाड येथील पठाणवाडी पुलावर झाला. त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ताहिरा चौधरी मूळच्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्या बहिणीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या नालासोपारा येथील बहिणीच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. चौधरी या त्यांचे मेहुणे रफीउल्ला त्यांच्या दोन मुलांसह माहिमचा दर्गा पाहण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. दुपारी अडीच्या सुमारास मालाड येथील पठाणवाडी पुलावर कोणताही सिग्नल न देता एक ट्रक रस्त्यात उभा करण्यात आला होता. त्यांच्या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे सर्वजण दुचाकीवरून खाली कोसळले. तक्रारदार ताहिरा यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी उठून पाहिले असता त्यांचे भाऊजी रफिउल्ला व बहिणीची मुलगी सोहेना बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडल्या होत्या. दुसरा मुलगा तेहरून यालाही किरकोळ मार लागला होता.

Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय गुजराती माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला
youth upload selfie video before commit suicide
मृत्यूपूर्वी चित्रफीत अपलोड करून तरूणाची आत्महत्या
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
retired army soldier firing
पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून एकावर गोळीबार; टेम्पो चालकाचा मृत्यू, येरवड्यातील घटना

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहातील प्राणवायू पुरवठा सुधारणार; नवीन गॅसवाहिनी बसवण्याचा निर्णय

सर्वांना उपचारासाठी डीएनए रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यातील रफिउल्ला व सोहेना दोघेही बेशुद्ध असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी कुरार पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात निष्काळजीपणे गाडी उभी करून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना दहिसर येथे घडली. त्यात ११ महिन्यांच्या मुलीचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. आचल असे मृत मुलीचे नाव आहे.

हेही वाचा >>> मुंबईः सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

आचल तिच्या कुटुंबियांसह दहिसर पूर्व येथे राहत होती. तिचे वडील राजू जैस्वाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे साडू संतोष जैस्वाल टेम्पो चालक आहेत. ते टेम्पो चालवून घरी आल्यानंतर त्यांच्या व राजू यांच्या मुलांना खाऊ घेऊन यायचे. त्यामुळे सर्व मुले त्यांच्या टेम्पोची वाट पाहत असायची. रविवारी ते टेम्पो घेऊन जात असताना त्यांना पाहून सर्व मुले धावत तेथे आली. आचल टेम्पोच्या डाव्या चाकाखाली काहीतरी उचलण्यासाठी गेली असता संतोषने टेम्पो पुढे नेला असता तिचे डोके टेम्पोखाली चिरडले. सर्व मुलांनी आरडाओरडा केला असता संतोषने टेम्पोखालून मुलीला बाहेर काढले. सर्वजण तिला घेऊन धारखाडी येथील एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी तिला कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिला तेथे नेले असता डॉक्टरांनी आचलची तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी संतोष जैस्वालविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.