मुंबई : बोरिवलीमधील कल्पना चावला चौकात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची परांची कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार, तर आणखी एक जण जखमी झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरिवली पश्चिमेकडील सोनी वाडी परिसरात ही दुर्घटना घडली. या परिसरात २४ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीभोवती कामगारांसाठी बांबूची परांची बांधण्यात आली होती. दुपारी १ च्या सुमारास अचानक सोळाव्या मजल्यावरून परांचीचा काही भाग कोसळला. त्यात चार जण जखमी झाले. या जखमींना कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तिघांचा रुग्णाला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनोरंजन समाज (४२), शंकर वैद्य (२५), पियुष हरदार (३८) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सुशील गुप्ता (३५)  गंभीर जखमी झाले आहेत.